Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

अश्लीलतेचा कळस, धावत्या दुचाकीच्या टाकीवर तरूणीला बसवले

अश्लीलतेचा कळस, धावत्या दुचाकीच्या टाकीवर तरूणीला बसवले

जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल

marathiews24.com

पुणे – अश्लीलतेचा कळस, धावत्या दुचाकीच्या टाकीवर तरूणीला बसवले – धावत्या दुचाकीवर तरूणीला इंधन टाकीवर बसवून सुसाट चाललेल्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील शिंदेवाडी भागातील खेड शिवापूर परिसरातून जाणार्‍या रस्त्यावरचा असल्याचे बोलले जात आहे. धावत्या दुचाकीवर तरुणी टाकीवर उलट्या दिशेने बसली असून, तिच्यासोबतचा तरूण गाडी चालवित असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी नेटकर्‍यांनी जोडप्याला चांगलेच सुनावले असून, वाहतूक नियमांची एैशी-तैशी करणार्‍या संबंधिताविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दुचाकीस्वार तरूणाने तरूणीला गाडीच्या टाकीवर उलट्या दिशेने बसविले आहे. साधारणपणे ४० ते ५० प्रतितास वेगाने दुचाकी चालवित तरूण जोडपे आपल्याच मस्तीत मग्न असल्याचेही दिसून आले आहे. पाठीमागून जाणार्‍या अनेक मोटारीतील लोकांनी संबंधित जोडप्याचा व्हिडिओ चित्रीत केला आहे. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करीत त्यांच्याविरूद्ध वाहतूक नियमभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, धावत्या दुचाकीवरही जोडपे प्रेमात आकंठ बुडाले होते. आजूबाजूचे लोक आपल्याला पाहत आहेत, याचे भान त्यांना नसल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे. हायरल व्हिडिओ आता चर्चेचा विषय बनला आहे.

जोडपे झाले सोशल मीडियावर ट्रोल

वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत स्वतःसह दुसर्‍याच्या जीवाला धोका निर्माण करणार्‍या जोडप्याविरूद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नेटीझन्सनी केली आहे. काही जण काय हा थिल्लरपणा असा सवाल करीत अनेकांनी त्यांच्या कृतीबाबत राग व्यक्त केला आहे. घटनेमुळे सार्वजनिक रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, दुचाकी क्रमांकाच्या आधारे जोडप्याविरूद्ध कारवाई होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×