गोल्फ क्लबमधून मारलेल्या चेंडूने दुचाकीस्वार गंभीर जखमी – येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल
Marathinews24.com
पुणे- नागरिकांनो सावधान तुम्ही जर येरवड्यातील गोल्फ क्लब परिसरातून प्रवास करीत असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पिस्तूलातील गोळीपेक्षाही भेदक वेगाने चेंडू येउन तुम्हाला गंभीर जखमी करू शकतो. त्यामुळे हेल्मेटसह अंगरक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अशाच एका चेंडूमुळे चक्क दुचाकीस्वार तरूणाच्या छातीत लागल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला आहे.
गाडीवरचे नियंत्रण सुटले अन झाला अपघात – सविस्तर बातमी
गोल्फ क्लबमधून मारलेला चेंडू दुचाकीस्वार तरुणाच्या छातीवर आदळल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोल्फ क्लब व्यवस्थापन, तसेच अज्ञाताविरुद्ध दुखापत केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रणील अनिल कुसळे (वय ३५, रा. येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कुसळे आणि त्यांचे मित्र संदीप भातकर यांच्यासोबत २९ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास येरवड्यातील उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी गोल्फ क्लबमधून गोल्फ खेळताना मारलेला चेंडू त्यांच्या छातीवर आदळला. त्यानंतर चेंडू तेथून जाणार्या एका वाहनावर आदळला. घटनेत कुसळे यांच्या छातीला दुखापत झाली. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.ह याप्रकरणी कुसळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार रेड्डी तपास करत आहेत.