Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

डॉ.आंबेडकर भवन शेजारील जमीन खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय अखेर रद्द

डॉ.आंबेडकर भवन शेजारील जमीन खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय अखेर रद्द

कृती समितीने मानले शासनाचे आभार

marathinews24.com

पुणे – शहरातील मंगळवार पेठ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शेजारील जागा आंबेडकर भवनांच्या विस्तारीकरणासाठी मिळावी अशी आंबेडकरी चळवळीची मागणी होती. मात्र ही जागा एका खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन बिल्डरला जागा देण्याचा निर्णय अखेर रद्द केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तार कृती समितीच्या वतीने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला असून शासनाचे आभार मानले आहेत.

ग्रंथालयांच्या पुर्नबांधणीसाठी ठोस पावले उचलू – मंत्री चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी 

राज्य शासनाने आंबेडकरी जनभावनेची व आंदोलनाची दखल घेऊन नियोजित स्मारकाच्या जागेतील खासगी विकसकाच्या कामाला स्थगिती दिल्याबद्दल शासनाचे , मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानत आहोत. तसेच हा विजय आंबेडकरी पक्ष संघटनांच्या एकजुटीचा व सामाजिक संघटनांच्या आंदोलनाच्या दबावामुळे झाल्यामुळे सर्व आंदोलकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो, असे शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले. तर आंबेडकरी आंदोलकांनी २५ वर्षांपासुन सातत्यपूर्ण केलेली लढाई व चळवळीतील दोन पीढ्यांचा हा विजय असून शासनाने शक्य तितक्या लवकर या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक उभे करावी अशी भावना आंबेडकरी जनतेमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेही आभार व्यक्त करीत आहोत. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे,अशी भावना आंदोलनाचे समन्वयक राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यात भव्य स्मारक व्हावे ही आंबेडकरी समाजाची मागणी होती. त्यासाठीचा ठराव पुणे महापालिकेने मंजूर केलेला असताना सदरची जमीन खासगी बिल्डरला देण्यात आली होती, कृती समितीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे या बाबत पाठपुरावा केला होता, येत्या १५ ऑगस्ट रोजी ५० ते ६० हजार लोक ठिय्या आंदोलन करणार होते, त्याची जोरदार तयारी सुरू होती, आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बिल्डरला जमीन देण्याचा निर्णय रद्द केला याबद्दल समिती त्यांची आभारी आहे, आता लवकरात लवकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक या जागेवर उभारावे अशी मागणी आंदोलनाचे समन्वयक परशुराम वाडेकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×