सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल ३० लाख ४५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १ डिसेंबर २०२४ ते २० जानेवारी २०२५ कालावधीत धनकवडीत घडली आहे. याप्रकरणी जेष्ठाने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात दागिने चोरीचे सत्र कायम – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक धनकवडीत राहायला असून, १ डिसेंबर २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादित केला. त्यानुसार जेष्ठाने गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या दीड महिन्यात तब्बल ३० लाख ४५ हजारांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा न मिळल्यामुळे संबंधिताकडे विचारपूस केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी जेष्ठासोबतचा संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जेष्ठाने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार तपास करीत आहेत.
नोकरीच्या आमिषाने तरूणाला ११ लाखांचा गंडा
नोकरी देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १० लाख ६७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ ते २५ मे कालावधीत धानोरीत घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. साबयर चोरट्यांनी तरूणाचा विश्वास संपादित करून त्याला नोकरी देण्याची बतावणी केली होती. त्यासाठी लिंक पाठवून तरूणाला माहिती भरण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर टास्कच्या नावाखाली १० लाखांवर रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करीत आहेत.






















