मराठा देशमुख वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न

२८० नवोदित वधू-वरांची नोंदणी; www.kadamvivah.in संकेतस्थळाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण

marathinews24.com

पुणे – समाजातील तरुण पिढीला विवाहाच्या निमित्ताने एकत्र आणत, संवाद साधण्याची आणि ओळखी दृढ करण्याची ऐतिहासिक संधी ठरलेला मराठा देशमुख वधू-वर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात तब्बल २८० नवोदित वधू-वरांनी नोंदणी करून आपला सहभाग नोंदविला. मेळाव्याला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून उत्साहात भर टाकली.

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजे मुक्त दहिहंडीचा थरार – सविस्तर बातमी

मराठा जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र कुंजीर, डॉक्टर सुनील जगताप, मराठा अभ्यासक जगजीवन काळे, मराठा महासंघाचे अनिल तागडे, शिवप्रहार संघटना अध्यक्ष अनिल बोटे, विष्णुपंत पासलकर, संतोष अतकरे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, शरद बाप्पू काकडे, बाळासाहेब भोईटे, भानुदास पायगुडे, दिलीप ढमाले, दिलीप पोषण, श्रीकांत मेमाणे, गणपत साळुंखे, अभिजीत उंद्रे आदींचा समावेश होता.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते www.kadamvivah.in या विवाह-जुळवणी संकेतस्थळाचे अनावरण व लोकार्पण करण्यात आले. “आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन प्लॅटफॉर्मचीही गरज आहे. www.kadamvivah.in या संकेतस्थळामुळे तरुणाईला तंत्रज्ञानाचा उपयोग करून विवाह-जुळवणी अधिक सोपी आणि पारदर्शक पद्धतीने साधता येईल.” समाजातील युवक-युवतींना अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे.

आपल्या मनोगतात मराठा जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र कुंजीर यांनी सांगितले की, “विवाह म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नाही, तर दोन कुटुंबांचं ऐक्य असतं. समाजाच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज आहे. नातेसंबंध दृढ व्हावेत, समाज एकत्र यावा आणि तरुणांना योग्य जोडीदार निवडता यावा यासाठी हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त आहे. “आजचा हा मेळावा केवळ विवाह जुळवणीसाठी नाही, तर समाजातील बंधुभाव, एकता आणि संस्कृती जपण्याचं माध्यम आहे”,

मराठा देशमुख वधू-वर मेळावा हा समाजातील तरुणांना दिशा देणारा, विवाह संस्थेला नवी ऊर्जा देणारा आणि सामाजिक ऐक्य बळकट करणारा ठरला.नितीन भैय्या कदम यांच्या पुढाकाराने झालेला हा उपक्रम समाजाच्या इतिहासात एक आदर्श नोंद म्हणून नोंदवला जाईल, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मराठा आणि देशमुख वधू वर मेळावा या उपक्रमाची संकल्पना मराठासेवक नितीन भैय्या कदम (जहागिरदार) यांची होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश टेळेपाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन विशाल कोंढाळकर यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×