गणेशोत्सवासह इतर समाजोपयोगी उपक्रमांची बांधली मोट
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवासह इतर समाजोपयोगी उपक्रमांची मोट बांधणारे चित्रपट निर्माते, क्रिकेट खेळाडू आणि तरुण उद्योजक अशी ओळख असलेल्या पुनीत दादा बालन यांचा सामाजिक उपक्रमांची मोहिम कौतुकास पात्र ठरत आहे. यावर्षीच्या गणेश उत्सवासाठी पर्यावरण संवर्धनासाठी प्राधान्य देत त्यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. कधी शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, तर कधी ग्रामीण भागातील निराधार गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दायित्व पार पाडले आहे. विद्यार्थ्यांना सायकल, तरुणांना संगणक, देऊन भावी पिढीला ताकद देण्याचे काम बालन फाउंडेशन तर्फे केले जात आहे. दरम्यान, पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाजकार्य यांचा संगम आहे. याच परंपरेला पुढे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आणि गणेश उत्सवप्रमुख उद्योजक पुनीत बालन हे पुढे घेऊन जात आहेत.

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार – सविस्तर बातमी
पुनीत दादा बालन हे प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते असून. पुण्याच्या गणेशोत्सवात त्यांचा सक्रिय सहभागी असतो. दरवर्षी बालन ग्रुपतर्फे अनेक गणेश मंडळांना मदत करणे, अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. प्रामुख्याने आर्थिक हातभार लावण्यासाठी प्रायोजकत्व देऊन सहकार्य केले जाते. विशेषतः पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ते शाडू मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देत असतात. याशिवाय त्यांच्या सामाजिक संस्थांमार्फत गरजूंना अन्नदान आणि वैद्यकीय मदतीसारखे उपक्रम गणेशोत्सवात राबवले जातात. गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वाला बळकटी देण्यासाठी बालन ग्रुपने मंडळांना सबळ पाठबळही दिले आहे.
पुनीत बालन ग्रुपतर्फे गरजू विध्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय – सविस्तर बातमी
बालन ग्रुपकडून गणेशोत्सव काळात लाखो भाविकांचा ओघ लक्षात घेऊन स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष लक्ष दिले जाते. गणपती बाप्पा केवळ भक्तीपुरता मर्यादित नाही, तर समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देणारा आहे, असल्याचे पुनीत दादा बालन यांचे म्हणणे आहे. सामाजिक जाणिवेबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांनाही त्यांनी आर्थिक चालना दिली. स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळावे यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने नृत्य, संगीत, चित्रकला स्पर्धांचे अनेक वेळा आयोजन केले आहे. त्याच माध्यमातून युवकांना आपली कला सादर करण्याची संधीही मिळाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण कार्यक्रमात पर्यावरणपूरक सजावट आणि कमी विद्युत वापरावर भर देण्यात आला आहे. दरवर्षी बालन ग्रुपच्यावतीने घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यंदाचा गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा केला जात असताना केवळ उत्सव नव्हे तर समाजजागृतीचे हे मोठे साधन आहे, याचा प्रत्यय यंदा पुन्हा एकदा येतोय. “उद्योजक म्हणून यश मिळवणे महत्वाचे आहेच, पण त्या यशाचा काही भाग समाजासाठी परत देणे हाच खरा गणेशोत्सव आहे. असेही पुनीत दादा बालन यांनी सांगितले आहे.

वैभवशाली परंपरा लाभलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात सामाजिक जाणीवतेचा प्रकाश टाकण्याचे कामही त्यांच्याकडून केले जात आहे. त्यामुळेच, परंपरेला आधुनिकतेची जोड देत समाजहिताच्या कार्यात सहभागी होणारे उद्योजक म्हणून पुनीत दादा बालन हे पुणेकरांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया..





















