Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय

सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन

marathinews24.com

पुणे – ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरात सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना हक्काची अभ्यासिका व ग्रंथालय उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारने सर्पमित्रांची घेतली दखल; विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस – सविस्तर बातमी

शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्रात ‘पुनीत बालन ग्रुप’चे कार्य हे उल्लेखनीय असे आहे. त्यांच्या या कामाचे क्षेत्र केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही तर या कामाचा विस्तार काश्मिरपर्यंत झालेला बघायला मिळतो. पुणे हे तर राज्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. परंतु अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिका व ग्रंथालयाचे भरमसाठ शुल्क भरणे शक्य होत नाही.

या विद्यार्थ्यांनाही चांगले शिकून मोठे होण्याचे स्वप्न साकार करता यावे या दृष्टीने ‘पुनीत बालन ग्रुप’ने पुढाकार घेतला आणि पुण्यात अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसरात ७ हजार ५०० चौ. फुट इतकी प्रशस्त अशी दुमजली अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून या बांधकामाचे भूमिपूजन श्री. पुनीत दादा बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट शिरीष केंभावी, श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव बहिरट-पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त संजय सातपुते आणि वृद्धेश्वर चौपाटीचे लाला गायकवाड उपस्थित होते.

विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी बौद्धिक परिस्थिती मात्र गरीब नसते. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना या अभ्यासिका व ग्रंथालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या वाटेवर अभ्यासिका व ग्रंथालयाच्या माध्यमातून एक दिवा लावण्याची संधी आम्हाला मिळाली. यातूनच देशाची आणि समाजाची अधिक चांगली सेवा करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास आहे.’’ – पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×