Breking News
Pune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूक

पुण्यात ३२० पदक विजेत्‍यांचा होणार गौरव

पुण्यात ३२० पदक विजेत्‍यांचा होणार गौरव

क्रीडादिनी मिशन लक्ष्यवेध योजनेचा शुभारंभ

marathinews24.com

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुक्रवार २९ ऑगस्‍टला आंतरराष्ट्रीय पदक विजेत्‍यांसह राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेतील ३२० पदक विजेत्‍यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्‍स सेंटरचा शुभारंभही केला जाणार आहे. पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात दुपारी चार वाजता राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभ होणार आहे.

जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विराजमान – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्‍या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्‍यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार, आमदार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल, क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले उपस्‍थित रहाणार आहे.

उत्तराखंड येथे फेबुवारीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रने गौरवशाली कामगिरी केली होती. ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून इतर सहभागी राज्यांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. या स्‍पर्धेतील ३१४ पदक विजेत्‍या खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्‍यांना ७ ते ३ लाखांपर्यत बक्षिस दिले जाणार आहे. मार्गदर्शकांना ५० ते २० हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्‍यांमध्ये ऑलिम्‍पिक पदक विजेता स्‍वप्‍नील कुसाळे, आशियाई पदक विजेती राही सरनोबत, आदिती स्‍वामी, ऑलिम्‍पिकपटू देवेंद्र वाल्‍मिकी, विश्व करंडक विजेती प्रियंका इंगळे या दिगज्‍ज क्रीडापटूंचा समावेश आहे. सर्वाधिक ८ पदकांचा विक्रम करणाऱ्या आदिती हेगडे हिला ३२ लाखांचे बक्षिस प्राप्‍त होणार आहे. राज्याच्या क्रीडा धोरण-२०१२ नुसार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांना २८ कोटी ७० लाख रुपये रकमेची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. आंतराराष्ट्रीय स्‍पर्धेत पदकाची लयलूट करणाऱ्या ६ पदक विजेत्‍यांचाही गौरव केला जाणार आहे.

कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्ष्यवेध महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ व बोधचिन्‍ह अनावरण केले जाईल. वार्षिक रु.१६० कोटी इतका खर्च मंजुर केलेल्या योजनेत १२ क्रीडा प्रकारांची निवड केली आहे. सर्व क्रीडा प्रकारातून राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, पहिल्या टप्प्यातील सहा क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण योजनेचा शुभांरभ शुक्रवारी होईल. यामध्ये ॲथलेटिक्‍स, हॉकी, कुस्‍ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस खेळाचा समावेश असल्‍याची माहिती सहसंचालक सुधिर मोरे यांनी दिली आहे. कार्यक्रमासाठी ३०० खेळाडू, १०० मार्गदर्शक आणि १०० पदाधिकारी, क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षणार्थी असे ८०० जण उपस्थित राहणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×