उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कारवाईची मागणी
marathinews24.com
ठाणे – शासकीय मुलींचे निरीक्षणगृह/विशेषगृह, उल्हासनगर–५ येथून ६ मुली बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन पाठवून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह ११ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या यघटनेत तीन मुलींचा शोध लागला असला तरी उर्वरित तीन मुली बेपत्ता आहेत. यापूर्वी देखील अशा घटना घडल्यामुळे राज्यातील बालगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.तत्काळ उपाय योजनांमध्ये डॉ. गोऱ्हे यांनी सतर्क महिला पोलिसांची गस्त वाढविणे, परिसरातील दलाल व फूस लावणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच जिल्हा प्रशासन आणि संबंधित संस्थेच्या प्रमुखांसह समन्वय साधून शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनाची प्रत महिला व बालविकास मंत्री, गृह विभागाचे सचिव, महिला व बालविकास विभागाचे सचिव आणि आयुक्त यांना पाठविण्यात आली असून, डॉ. गोऱ्हे यांनी या गंभीर समस्येवर वैयक्तिक लक्ष घालून ती मुळापासून सोडविण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.






















