Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

सहप्रवासी मैत्रीण जखमी

marathinews24.com

पुणे – शहरातील कात्रज बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसमच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली.

अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय; धनकवडीतील लाॅजवर छापा – सविस्तर बातमी 

नितीन जुनवणे (वय १९, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात नितीन जुनवणेची सहप्रवासी मैत्रीण जखम झाली. मैत्रिणीने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार तरुणी आणि दुचाकीस्वार नितीन हे महाविद्यालात शिक्षण घेत आहेत. १२ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार नितीन आणि त्याची मैत्रीण नवले पूल परिसरातून कात्रजकडे रात्री पावणेदहाच्या सुुमारास निघाले होते. त्यावेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघे जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार नितीन याचा रुग्णालयात उपचारापूर्वींच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या आराम बस चालकाचा शोध घेण्यत येत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×