अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय; धनकवडीतील लाॅजवर छापा

अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय; धनकवडीतील लाॅजवर छापा

दलाला महिलेसह तिघे अटकेत

marathinews24.com

पुणे – वेश्याव्यवसाय प्रकरणात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षाने पुणे-सातारा रस्त्यावरील एका लाॅजवर छापा टाकला. या कारवाईत एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेण्यात आले. तरुणीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन दलाल महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.

महापालिकेच्या कर आकारणी विभागात रिव्हाॅल्वर उगारुन धमकी – सविस्तर बातमी 

वर्षा शंकर शिरसाठी (वय ३५, रा. विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (वय ३५, रा. पेपर मिलसमोर, साने चौक, चिंचवड), जीवन प्रमोद इंगोले (वय ३३, सध्या रा. साई लाॅज, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये (पिटा) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील साई लाॅजमध्ये एका अल्पवयीन युवतीला आरोपी दलाल शिरसाठी, जेधे यांनी आणले होते. अल्पवयीन युवतीला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायास प्रवृ्त केले जात असल्याची महिती पोलिसांना मिळली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी लाॅजमधून एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी अल्पवयीन युवतीला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक इम्रान नदाफ, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, रेश्मा कंक, इंगळे यांनी ही कारवाई केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×