Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

रंगली सलग १०१ गीतांची सुरेल विक्रमी मैफल..!

रंगली सलग १०१ गीतांची सुरेल विक्रमी मैफल..!

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजन; उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये

marathinews24.com

पुणे – गानकोकिळा भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात कोथरूड येथील अंबर हॉलमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘लतांजली’ या नावाने सादर झालेल्या या कार्यक्रमात सलग १०१ गीतांची सुरेल मैफल रंगली. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री ८ वाजेपर्यंत असा सलग दहा तास चालला. या उपक्रमाची नोंद ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली.

व्हीनस वर्ल्ड स्कूल्सतर्फे ‘सन्मान आदी नारिशक्ती’ कार्यक्रम उत्साहात – सविस्तर बातमी 

आरती दीक्षित यांच्या संकल्पनेतून, हार्मनी इव्हेंट्स मॅनेजमेंटचे संस्थापक आमोद देव आणि अपूर्वा देव यांच्या आयोजनातून पार पडलेल्या या संगीतमय आदरांजलीत ३५ हून अधिक कलाकारांनी एकल व द्वंद्व गीतांच्या माध्यमातून लतादीदींना अभिवादन केले.या कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाला खा.मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर उपस्थित होत्या.त्यांच्या हस्ते सर्व सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले. लता मंगेशकर यांची १०६ गाणी सलग गाऊन ‘ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’ मधे या कार्यक्रमाची नोंदणी झाल्याचे डॉ.इंद्रजित मोरे यांनी जाहीर केले.कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लतादीदींच्या गाण्यांनी वातावरण भारून टाकले आणि पुणेकर संगीतप्रेमींनी एका दिवसात १०१ गाण्यांचा आनंद घेत अविस्मरणीय अनुभव घेतला.

या कार्यक्रमात संजीव टांकसाळी, मिलिंद दामले, तुषार साधले, अनिता तळेले, ममता नरहरी, मृणाल भिडे, सुजाता माळवे,निशी बोथे, स्वाती बोरावके, विद्या हजारे,गायत्री बेलसरे, अश्विनी दातार, शिल्पा,वसुधा कुलकर्णी, मीनाक्षी दुसाने, शुभांगी पांचाळ, मृणालिनी चव्हाण,वर्षा भालेराव, प्रेरणा जेऊरकर,दिशा वालावलकर, सुनीता जाधव,भावना शुक्ला, मीना अवचट, शमा देशपांडे, श्रद्धा चौधरी, संजय खटावकर, अनघा धोपाटे, जयश्री रोकडे,गायत्री लडकत, माधव राखेलकर, रवींद्र क्षीरसागर, सोमनाथ हिवराळे, आमोद देव, प्रकाश सावंत, मोहित पारखी, दिलीप करमरकर यांनी आरती दीक्षित यांना साथ देत कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×