Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात डिलीव्हरी बॉयवर अल्पवयीन मुलीने टाकले जाळे

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

साथीदारांच्या मदतीने केले अपहरण, तिघांना अटक
भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – डिलीव्हरी बॉयचे अपहरण करुन गुन्ह्याच्या धमकीने १० हजारांची खंडणी उकळणार्‍या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले आहे. ही घटना ७ ते ८ डिसेंबर कालावधीत कात्रज घाटात घडली होती. अक्षय गंगाधर बुधेवार (वय २२ रा. गोकुळनगर, कात्रज) अमोल अंकुश शिंदे ( वय २८, रा. कर्वेनगर, कोथरूड) राहुल तानाजी शितोळे (वय २३ रा. महादेवनगर, शेलार मळा, कात्रज) याप्रकरणी प्रकाश दिनकर जोरी ( वय २८ रा. भुगाव) असे तक्रारदाराचे नाव आहे.

हडपसरमध्ये खासगी रुग्णालयाची तोडफोड भोवली – सविस्तर बातमी

तक्रारदार राहूल शितोळे डिलीव्हरी बॉय असून, ७ डिसेंबरला गुन्ह्यातील मुलीने त्याला कात्रज चौकात भेटायला बोलवुन घेतले. तिच्यासोबत कात्रज घाटात जात असताना मुलीचे साथीदार राहुल शितोळे, ऋषीकेश सुरते यांच्यासह दोघांनी राहूलला थांबवले. त्याला जबरदस्तीने येवलेवाडीत नेउन आरोपी अक्षय शेलार याच्यासह साथीदारांनी त्याला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. पोक्सो अंर्तगत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ७० हजारांची खंडणी मागितली. त्यानंतर १० हजार रूपये रोख घेउन उर्वरित खंडणीसाठी सातत्याने फोन केला. याप्रकरणी राहूलने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश मोकाशी, महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार यांनी आरोपींचा माग काढला. तिघांना ताब्यात घेत १० डिसेंबरला अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहीते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, एपीआय स्नेहल थोरात, नागेश पिसाळ, नवनाथ खताळ, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांनी केली.

फसवणूक झाली असल्यास कळवा

नागरिकांनो तुमचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेउन माहिती द्यावी. त्यामुळे संबंधित टोळीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×