Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

भोंगवली जीआयएस सबस्टेशनसाठी नुकसान टाळून मार्ग काढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chakan Hinjewadi Infrastructure Plan

भोरमधील शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल; महापारेषण व केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून व्यवहार्य पर्याय शोधण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

marathinews24.com

मुंबई – केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या नवीकरणीय ऊर्जेच्या ग्रीन कॉरिडॉरमधील भोर तालुक्यातून जाणाऱ्या ट्रान्समिशन लाइन व भोंगवली येथील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन उभारताना स्थानिकांच्या अडचणी समजून घेत स्थानिक नागरिकांचे कमीत कमी नुकसान होईल, असा सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांना दिले.

पुण्यात गणेशोत्सवात चार बेस-चार टॉप फॉर्म्युल्याची चाचपणी – सविस्तर बातमी 

भोंगवली येथील प्रस्तावित जीआयएस सब स्टेशनबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. सबस्टेशनची जागा, विद्युत वाहिन्यांचे संरेखन आणि भविष्यातील वाढीव विद्युत भार यांचा विचार करून व्यवहार्य पर्याय तपासण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भोरमधील शेतकऱ्यांची विविध प्रकल्पांसाठी यापूर्वीच जमीन गेलेली असताना पुन्हा या प्रकल्पासाठी जमीन मागितली जात असल्याचे स्थानिक समितीचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे जवळपास ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुण्यासारख्या औद्योगिक जिल्ह्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आवश्यक सबस्टेशन्स उभारली नाहीत तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर वीजटंचाई निर्माण होऊ शकते. पुणे जिल्ह्यातील विविध इतर तालुक्यांमध्येही सबस्टेशन्सची कामे सुरू आहेत. मात्र, भोरमधील नागरिकांच्या अडचणी शासनाने समजून घेतल्या असून, त्या सोडविण्यासाठी मार्ग काढला जाईल. या समस्येवर महापारेषण तसेच केंद्र सरकारचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रकल्प असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

सबस्टेशनच्या कामामुळे स्थानिकांचे कमीत कमी नुकसान कसे होईल, उपलब्ध जागेचा योग्य वापर कसा करता येईल आणि भविष्यातील विद्युत वाहिन्यांबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन कसे करता येईल, याचा विचार केला जाईल. ग्रीन कॉरिडॉरला विरोध केल्यास त्याचा परिणाम पुण्याच्या विकासावर होऊ शकतो. त्यामुळे स्थानिकांनीही सहकार्य करावे आणि सर्वांच्या हिताचा मध्यममार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, आमदार शंकर मांडेकर, भोर राजगड सब स्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांच्यासह ग्रामस्थ, अदानी पॉवरचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×