गणेश विसर्जन सोहळ्यात दागिने लांबविणारा चोरटा गजाआड

७ लाखांचे दागिने जप्त

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन सोहळ्यात भाविकांकडील सोनसाखळी लांबवून पसार झालेल्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून, ७ लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
परशा उर्फ प्रशांत शिवराम शिंदे (वय २२, रा. खुळेवाडी, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मोटार चालकावर कोयत्याने वार करणारा गजाआड – सविस्तर बातमी

गणेश विसर्जन सोहळ्यात ६ सप्टेंबर रोजी बेलबाग चौकात भाविकांकडील सोनसाखळी लांबविण्याच्या घटना घडल्या होत्या. गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. बेलबाग चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले होते. तांत्रिक तपासात पोलीस कर्मचारी अर्जुन थोरात यांनी संशयित चोरटा शिंदे याला हेरले होते. त्यानंतर पोलीस तपासात बेलबाग चौकात भाविकांकडील सोनसाखळी लांबविण्याचे गुन्हे पराशा शिंदे याने केल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल भोसले यांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेश ऊसगावकर आणि पथकाने शिंदे याला खुळेवाडी परिसरात सापळा लावून पकडले. शिंंदे याच्याकडून ७ लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.

शिंदेने शेजारी राहणाऱ्या एकाकडे ठेवले होते दागिने

आरोपी शिंदेने विसर्जन सोहळ्यात भाविकांकडील सात लाखांचे दागिने लांबविले असून, विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेले सात गुन्हे उघडकीस आले आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर, सचिन कदम, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, अमोल भोसले, आशिष खरात, सागर मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×