नादमधुर बासरी वादनातून रसिकांना अनोखी भावानुभूती

नादमधुर बासरी वादनातून रसिकांना अनोखी भावानुभूती

पंडित मिलिंद शेवडे यांचे सुमधुर बासरी वादन

marathinews24.com

पुणे – नादमधुर, शांत, संयमी बासरी वादनातून रसिकांना आज अनोख्या भावानुभूतीचा आनंद मिळाला. डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे बासरी वादक पंडित मिलिंद शेवडे यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय बासरी वादनाच्या मैफलीचे. मासिक स्वरमयी बैठकीअंतर्गत रविवारी (दि. २६) या मैफलीचे आयोजन स्वरमयी गुरुकुल सभागृह, शिवाजीनगर येथे केले होते.

श्री उमांगमलज जन्मोत्सवात श्रीमंत दगडूशेठ बाप्पाला ११०० नारळांचा महानैवेद्य – सविस्तर बातमी 

पंडित मिलिंद शेवडे यांनी बासरी वादन मैफलीची सुरुवात राग बिलासखानी तोडीतील आलाप, जोड, मध्य विलंबित तीनताल आणि मध्यलय एकतालातील गत ऐकवून केली. राग शुद्ध सारंग सादर करताना विलंबित झपताल व तीनताल वादनातील प्रभुत्व दर्शविले. राग पिलूमधील धून सादर करून पंडित शेवडे यांनी रसिकांना वेगळ्या भावविश्वाची सुरेल सफर घडवून आणली. मैफलीची सांगता मिश्र भैरवीने करताना पंडित शेवडे यांनी गुरुकृपेतून मिळालेल्या ज्ञानातून वादनात आलेली भावोत्कटता दर्शवित रसिकांना संमोहित केले.

पंडित माधव मोडक यांनी तबल्यावर संयमित व समर्पक साथसंगत करून मैफलीत रंग भरले. गुरू माँ अन्नपूर्णा देवी यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याकडून ज्ञानप्राप्तीची निर्माण झालेली आस आणि सुमारे नऊ वर्षांपेक्षा अधिक काळ लाभलेले मागदर्शन अशी वाटचालही पंडित मिलिंद शेवडे यांनी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या फूमी नेगिशी यांनी केले तर कलाकारांचा सत्कार डॉ. अश्विनी वळसंगकर यांनी केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×