Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

प्रभात रोडवर तरुणाची सोनसाखळी हिसकावली

प्रभात रोडवर तरुणाची सोनसाखळी हिसकावली

चोरट्यांविरुद्ध डेक्कन पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील ८४ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना प्रभात रस्त्यावर घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध डेक्कन पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची ५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

तक्रारदार २३ वर्षीय तरुण सदाशिव पेठेत राहायला आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दुचाकीस्वार तरुण शनिवारी (४ ऑक्टोबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास प्रभात रस्त्यावरुन निघाला होता. ईराणी कॅफेसमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ८४ हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. तरुणाने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी प्रभात रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

ज्येष्ठाकडील दोन लाखांची सोनसाखळी चोरी

पुणे – पीएमपी प्रवासी ज्येष्ठाकडील दोन लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट स्थानकात घडली. याबाबत एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कात्रज भागातील आंबेगाव परिसरात राहायाल आहेत. ते शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास स्वारगेट स्थानकातून आंबेगावकडे निघाले होते.

पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यंनी त्यांच्या गळ्यातील एक लाख ९५ हजारांची सोनसाखळी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत. पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने, मोबाइल संच लांबविण्यच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील गर्दीच्या पीएमपी स्थानकांवर चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. पीएमपी प्रवाशांकडील दागिने लांबविण्याच्या दिवसाआड एक ते देान घटना घडतात. पीएमपी प्रवाशांकडील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×