गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कामगिरी
marathinews24.com
पुणे- जबरी चोरीच्या गुन्ह्यात तब्बल १४ वर्ष फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अटक केली आहे. समीर अशोक भागवत (वय ४३ रा. नॅशनल पार्क माणिक बाग सिंहगड रोड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०११ साली सराईत आरोपी निलेश चौगुले याच्यासोबत गाडीने जावुन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; पुण्यातील बिबेवाडी तील घटना – सविस्तर बातमी
गुन्हे शाखा युनीट तीनचे पथक १८ एप्रिलला हद्दत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सहायक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे व पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी समीर भागवत हा सिंहगड रस्ता परिसरातील गोयलगंगा सोसायटीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. तसेच २००८ मध्ये वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एकाचा खून केला होता. तसेच तो कुरार पोलीस ठाण्यातंर्गत दाखल जबरी चोरीच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शानाखाली पथकाने सापळा रचला.
पथकाने गोयलगंगा सोसायटी, सिंहगड रोड परिसरात शोध घेतला असता, आरोपी समीर मिळुन आला. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, तुपसौंदर, पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, कैलास लिम्हण, सुजित पवार, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.