शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी
marathinews24.com
पुणे – राज्यात शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ ला प्रविष्ठ होण्यासाठी १४ मे २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. एनसीएल प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीनुसार मिळालेले एनसीएल प्रमाणपत्र पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.