Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून पदाधिकाऱ्याला मारहाण

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा पदाधिकारी असलेल्या कार्यकर्त्यांला टोळक्याने कार्यालयात शिरून बांबूने मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत दिनेश पंडित खराडे (४७, रा. संत ज्ञानदेव शाळेजवळ, महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महर्षीनगर येथील त्यांच्या कार्यालयात ५ नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास घडला.

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खराडे हे सिव्हिल इंजिनिअर असून बांधकाम व्यावसायिक आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाचा माहिती अधिकार सेलचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव शाळेजवळ यांचे कार्यालय आहे. ५ नोव्हेंबर रोजी ते कार्यालयात असताना रात्री दहाच्या सुमारास एक तरुण त्यांच्या कार्यालयात आला. त्याच्या हातामध्ये लाकडी बांबू होता. त्याने या बांबुने त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी तो बांबू हाताने पकडला. तेव्हा हा तरुण तेथून बाहेर पळून गेला. ते त्याच्या पाठोपाठ कार्यालयाच्या बाहेर गेले. तेव्हा बाहेर एका दुचाकीवर अगोदरच दोघे जण थांबले होते. त्यांच्या मागे बसून तो मार्केट यार्डच्या दिशेने तेथून पळून गेला. तो नेमका कोण होता, कशासाठी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×