Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पती, सासु, दीर, नणंद विरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक कारणावरून विवाहित महिलेचा शारीरिक छळ करुन घटस्फोट देण्यासाठी मानसिक दबाव टाकल्यामुळे महिलेने पंख्याला ओढणीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पती, सासु, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिशा निलेश शहा (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती निलेश शहा, सासू संगीता शहा, दीर प्रशांत शहा (तिघे रा. भुगाव) आणि नणंद ममता व्होरा (रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हीतश्री संदेश शहा (५७, रा. सोमजी हाईटस, श्रद्धानगर, कोंढवा) यांनी तक्रार दाखल केली आहे.

संगमवाडीत डंपर चालकाने दुचाकीस्वाराला उडविले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा आणि निलेश दिलीप शहा (३०, रा. माऊंट ब्लेएर सोसायटी, भुगाव) याच्याबरोबर जैन रुढी परंपरानुसार २० डिसेंबर २०२४ रोजी विवाह झाला. निलेश हा खासगी नोकरी करत असल्याने त्याने दिशाला नोकरी सोडायला लावली. विवाह झाल्यानंतर तिला सर्वजण त्रास देत होते. तु स्लो आहेस, तुला संसार जमत नाही. तसेच तुझे डोळे छोटे आहेत, असे बोलून तिला त्रास देत करत. दिशाला स्वयंपाक करायला लावायचे मात्र, तिने बनवलेले कोणीही खात नसे, अशा प्रकारे तिचा मानसिक छळ करत होते. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पती निलेश शहा, संगीता शहा, ममता व्होरा हे दिशाला घेऊन तिच्या माहेरी आले.

ममता व्होरा फिर्यादींना म्हणाली की, दिशाच लग्न का केलं आहे. निलेश बोलला की तिला प्रपंच जमणार नाही, असे बोलून तिला माहेरी सोडून निघून गेले. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी निलेश व संगीता शहा हे तिचे कपडे घेऊन आले. त्यावेळी निलेशने दिशापासून घटस्फोट घ्यायचा आहे. त्या दोघांनी दिशासोबत वाद घालून तिच्या गळ्यातील दीड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेले. त्यामुळे दिशा मानसिक तणावात होती. ३ ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. तेथून थोड्या वेळात परत आल्यावर दिशा हिने हॉलमधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर हितश्री शहा यांनी तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×