Breking News
मोबाइल हिसकावणार्‍या दोघांना अटक, विश्रामबाग पोलिसांची कामगिरीवादातून तरूणावर वार, मांजरी बुद्रूकमधील घटनावादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोडट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यूDevendra Fadnavis : सर्व शासकीय कार्यालयत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपिस्तूलाच्या धाकाने मारहाण करणार्‍याला अटकअधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने व समन्वयाने करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनाग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा आज मेळावाऔद्योगिकनगरीत अतिसाराचे बाधित वाढलेइंद्रायणीनगरच्या नाना-नानी उद्यानात बकालपणा

वाकड परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती

वाकड परिसरात तंबाखूविरोधी जनजागृती

लाइफ पॉइंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संस्कार प्रतिष्ठान तसेच शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने उपक्रम राबिविला 

marathinews24.com

पिंपरी – वाकड परिसरात तंबाखू विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. यासह वॉकेथॉनचे प्रभावीपणे आयोजन करण्यात आले. लाइफ पॉइंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संस्कार प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड यांच्या विद्यमाने तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

सेवानिवृत्तांचे आरोग्य शिबिर उत्साहात – सविस्तर बातमी 

या फेरीत सहभागी झालेल्यांनी सायकलीला आणि हातात विविध स्लोगन्स असलेले फलक घेऊन तंबाखूविरोधी संदेश दिला. ‘‘तंबाखूचा घास,जीवनाचा नाश’’, ‘‘तंबाखूला नाही म्हणा, आरोग्याची नाती जोडा’’,‘‘तंबाखूचा त्याग करा,जीवनात आनंद भरा’’ अशा प्रभावी घोषणांमुळे संपूर्ण परिसरात जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राकेश नेवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात तंबाखूचा मानवी आरोग्यावर होणारा घातक परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. उपक्रमात सुमारे २०० नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने डॉ. ललितकुमार धोका, डॉ. मिलिंद सोनावणे, डॉ. प्रफुल्ल तामसकर, डॉ. शिवमूर्ती खंडाळकर, डॉ. मोनिका दहिवलकर, डॉ. प्राची हेंद्रे, डॉ. विनायक गवळी, डॉ. धनराज हेळंबे यांच्यासह संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top