विद्यार्थी दिवसानिमित्ताने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन

पुण्यात विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना उपक्रम राबविण्याचे निर्देश; निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धांना उत्साहपूर्ण प्रतिसाद अपेक्षित

marathinews24.com

पुणे – विद्यार्थी दिवसानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे सहायक आयुक्त (समाजकल्याण) विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पसंती क्रमांकाद्वारे ११ कोटी रुपयाहून अधिक महसूल जमा-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी – सविस्तर बातमी

सामाजिक न्याय विभागामार्फत ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे येथे “शिक्षण हेच वाघिणीचे दूध” या विषयावर अ‍ॅड. विभीषण गदाचे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाबाबत विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये “विद्यार्थी दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो, असेही लोंढे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×