Breking News
अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशीना अटकपुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज, नियंत्रण कक्षही सुसज्जपुण्यातही रूटमार्च अन मॉकड्रीलशहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीशासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन द्याव्यात – व्यवस्थापकीय संचालक संजय काटकरजिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आधार संच वितरणाला सुरुवातअटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहनपुण्यात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छादकौटुंबिक वादातून साडूचा केला खून, मृतदेह वरंधा घाटात फेकलाधक्कादायक…सेक्स करतानाचे व्हिडिओ मित्रांना पाठवले

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘मॉकड्रिल’-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्ह्यात ६ ठिकाणी मॉकड्रिल – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

marathinews24.com

पुणे – केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्यादृष्टीने विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका याठिकाणी आज (दि.७ मे) दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’घेण्यात येणार आहे. मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम करावे, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी कार्यालयात मॉक ड्रीलबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, एनसीसी पुणे मुख्यालयाचे कमांडिग ऑफीसर कर्नल निशाद मंगरुळकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, पुणे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, यांच्यासह सर्वसंबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रील घेत आहोत. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली जाणार आहेत,त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.

केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आदी या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी कर्नल चतुर यांनी ‘मॉक ड्रिल’बाबत मार्गदर्शन केले. युद्धजन्य परिस्थितीत जनजीवन विस्कळीत सुरळीत राहण्याकरीता या मॉक ड्रीलला अनन्यसाधारण महत्व आहे, असेही कर्नल चतुर म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top