दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सरपंच पदासाठीचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आला सुपूर्द

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मस्साजोगसह जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेला दिनांक ७ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख गुरुवारी अकरा वाजता केज येथील तहसील कार्यालयात अर्ज सादर केला. यावेळी धनंजय देशमुख, महावीर सोनवणे, गणेश देशमुख , सहदेव घाटूळ, पंजाबराव देशमुख , सुधाकर सोनवणे, भागवत कदम, सुदर्शन देशमुख, आनंद सोनवणे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात निधन – सविस्तर बातमी

ग्रामपंचायत सरपंच पदासाठी चा नामनिर्देशन पत्र म्हणजेच निवडणूक अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. बीड जिल्ह्यातील रिक्त झालेल्या सरपंच आणि सदस्य पदाच्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचा राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून दिवंगत संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या करण्यात आली होती ,त्यानंतर मस्साजोग ग्रामपंचायतची सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती.

अश्विनी देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की गावकऱ्यांच्या इच्छेमुळे आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अण्णा जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांनी गावकऱ्यांसाठी जीवन गमवलं. आणि त्याच प्रमाणे मी देखील आता शेवटच्या क्षणापर्यंत गावांनी इच्छा दाखवली आणि मी त्यांची सेवा करीन. अण्णांचे भरपूर स्वप्न आहेत आता ते मी पूर्ण करेल. गावकऱ्यांच्या लढ्यामुळेच आम्ही यात उतरलोत आमची इच्छा नव्हती. मात्र सर्वसामान्य जनतेने गावकऱ्यांच्या इच्छामुळेच आम्ही या निवडणुकीत उतरलो अशी प्रतिक्रिया दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिली आहे.

गावातील अन्य इच्छुक उमेदवार स्वरूपानंद देशमुख हेही आज आपला सरपंच पदासाठीचा अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे मस्साजोगची निवडणूक बिनविरोध न होता चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे मस्साजोगची निवडणूकीत अजून किती इच्छुकउमेदवार अर्ज दाखल करणार आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत पोट निवडणुकीत सरपंच पदासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ कोणाला निवडून देणार आणि गावचा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×