केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात निधन

लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झाला अपघात

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी (दि.९) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तहसीलदार राकेश गिड्डे असे त्यांचे नाव आहे. गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख, स्वरूपानंद देशमुख आज उमेदवारी अर्ज दाखल करणार – सविस्तर बातमी

प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते. गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×