Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

Beed crime : अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार; आरोपीसह कुटुंबावर गुन्हे दाखल

हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

सवर्ण जातीतील या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी; या घटनेचा तपासासाठी नव्याने रुजू झालेले IPS अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम खाझड यांची नेमणूक

marathinews24.com

बीड : अनंत जाधव – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका सवर्ण समाजातील तरुणाने आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दहा वर्षांपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे.या घटनेतील आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.

श्वानाच्या मृत्यू प्रकरणी ‘पेटशाॅपच्या चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

बीड जिल्ह्यातील केजमधील एका गावात, दहा वर्षांपूर्वी सवर्ण समाजाच्या संभाजी दत्तू ढगे नावाच्या तरुण नराधमाने पीडित आदिवासी अल्पवयीन मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवत , तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडित मुलगी सुज्ञान झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी समाजातील तरुणासोबत लावून दिले.

पीडितेचे लग्न झाले असतानाही आरोपी संभाजी ढगे तिचा पाठलाग करत होता . तो तिच्या सासरी जाऊन तिच्या नवऱ्याला मारहाण करून तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार करत होता, तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही देत होता. या अत्याचारातून ती तरुणी गरोदर राहिली. ही बाब सासरच्या लोकांना माहिती होताच त्यांनी तिला माहेरी आणून सोडले.

जात दाखवून घराबाहेर काढले

आरोपी आणि कुटुंबाच्या छळाला कंटाळून पीडितेच्या नवऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केल्याचे उघड झाले आहे. सात महिन्यांची गरोदर असलेली पीडिता माहेरी परतल्यानंतर ती आरोपी संभाजी ढगे याच्या घरी राहिली आणि तिने लग्नाचा हट्ट धरला. परंतु, गरोदरपणाचे कारण देत आरोपीने लग्नास टाळाटाळ केली. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळ ढगे कुटुंबाने मुलाचा सांभाळ केला. मात्र, काही दिवसांनी आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला कामधंद्यासाठी बाहेरगावी पाठवले. त्यानंतर आरोपीचा भाऊ आणि आई-वडील यांनी “तू हलक्या जातीची आहेस” असे बोलून त्या आदिवासी तरुणीला तिच्या लहान बाळासह घराबाहेर हाकलून दिले. आरोपी संभाजी ढगे यानेही ‘आदिवासी असल्याने’ लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

वर्षभर वाट पाहूनही आरोपीने लग्न न केल्याने पीडितेने अखेर पोलीस ठाणे गाठले. दि. १५ ऑक्टोबर रोजी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी संभाजी दत्तू ढगे याच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३७६ (३) (बलात्कार), ३६६ सह पोक्सो कायद्याचे कलम ४, ६, ८ तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम ३(२), ३(व्ही), ३(१) (डब्ल्यू) (i), ३(१) (एक्स व्ही) (iii) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर घटनेचा तपास नव्याने रुजू झालेले आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम खाझड हे करत आहेत. पीडितेने यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे केज दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती सांगितली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×