Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

बीडच्या तालखेड खून प्रकरणाचा १२ तासात लावला छडा

बीडच्या तालखेड खून प्रकरणाचा १२ तासात लावला छडा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घेतले ताब्यात

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्हातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या १२ तासात तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतले आहे. विकास दत्तात्रय वाघमोडे (वय ३३) यांचा मृतदेह २९ जूनला त्यांच्या शेताजवळ आढळून आला होता. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला तपासादरम्यान महत्त्वाचे धागेदोरे मिळाले.

पुण्यात कॅफेतील गैरवर्तन भोवले; पोलीस उपनिरीक्षक निलंबित – सविस्तर बातमी 

आदित्य बारवाळ याच्यासोबत मयत विकास वाघमोडे यांचे काही दिवसांपूर्वी गंभीर वाद झाले होते. तसेच दोघांमध्ये मारामारी होऊन एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आदित्य बारवाळ याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, जुन्या वादाच्या रागातून २८ जूनला रात्री विकासचा पाठलाग करून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर चाकूने पोटावर दोन आणि गळ्यावर एक वार करून खून केल्याची माहिती दिली. कबुली जबाबानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने तसेच बप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते आणि गणेश मराडे यांच्या पथकाने केली आहे.

पोलीसांचे कौतुक

तालखेड येथे झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या १२ बारा तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा लावत या प्रकरणातील अरोपीला अटक करण्यास यश प्राप्त झाल्यामुळे जिल्हाभरातून बीड पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×