कात्रजमध्ये बंगल्यावर चोरट्यांचा हात साफ; ९० हजारांचे दागिने चोरीस गेले
marathinews24.com
पुणे – शहरानजीक कात्रज परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९० हजार रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना २० एप्रिलला सकाळी नउच्या सुमारास घडली आहे. प्रतिभा हेमंत दरवडे (वय ४५, रा. सार्थक बंगला, राजेश सोसायटी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाषाणमध्ये तलवारी नाचवत ५ दुचाकींची तोडफोड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश सोसायटीत दरवडे यांचा सार्थक बंगला आहे. दि. २० एप्रिलला सकाळी सव्वानऊ वाजता घराचा मुख्य दरवाजा लॉक करून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर त्यांनी कपाटातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दरवडे संध्याकाळी घरी परत आल्यानंतर घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल आहे.
शास्त्रीनगरमध्ये घरफोडी, दोन लाखांचा ऐवज चोरीला
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात घडली. याबाबत तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय शास्त्रीनगर भागातील मराठा महासंघ सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडले. कपाटातील २ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सोमवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.