Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात वेगवेगळ्या भागात घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरला

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी

कात्रज, हडपसर, लोहगाव भागात घरफोडी

marathinews24.com

पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून दागिने, रोकड असा ३ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. कात्रज, हडपसर, लोहगाव भागात घरफोडीच्या घटना घडल्या.

टेम्पोवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

कात्रजमधील सुखसागरनगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुखसागरमधील सदगुरु अपार्टमेंटमध्ये राहाला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत. तर हडपसरमधील काळेपडळ परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ८२ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी (२८ जून) घडली. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे वैष्णवीनगर येथे राहायला आहेत. चोरट्यांनी रविवारी दुपारी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्याची घटना घडली. रात्री घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

लोहगावमधील निरगुडी रस्त्यावर असलेल्या मैत्री पार्क सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×