Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

टेम्पोवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

लोणी काळभोर परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – टेम्पोवर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. राकेश राहुल गायकवाड (वय १९ रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली) असे मृत्यमुुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत अरुण कांतीलाल जाधव (वय ४२, रा अष्टविनायक अपार्टमेंट, कवडी पाट, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिस्तूल बाळगणारे सराइत अटकेत; लोणीकंद पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राकेश गायकवाड हा लोणी काळभोरमधील म्हातोबाची आळंदी परिसरातून निघाला होता. म्हातोबाची आळंदीतील स्मशानभूमीजवळ लावलेल्या टेम्पोवर आदळून तो गंभीर जखमी झाला. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस तपासात दुचाीकस्वार गायकवाड याच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.

नाेकरीच्या आमिषाने महिलेची पावणेदोन लाखांची फसवणूक

पुणे-नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची १ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने बाणेर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, महािती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. एका बांधकाम कंपनीत नोकरीचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. नोकरी मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगून चोरट्यांनी महिलेकडून ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी एक लाख ८१ हजार रुपये घेतले. चोरट्यांनी तिला नियुक्तीपत्र पाठवितो, असे सांगितले. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी तिला नियुक्तीपत्र दिले नाही, तसेच मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×