चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांकडून गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मित्रमंडळ काॅलनीतील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीश मेहता (वय ३५, रा. अनंत बिल्डींग, मित्रमंडळ काॅलनी, गल्ली क्रमांक १, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बिबवेवाडीत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता व्यावसायिक आहेत. मेहता यांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, मित्रमंडळ काॅलनीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे.
रेंजहिल्स परिसरात घरफोडी
रेंजहिल्स परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ७८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने खडकीे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीतील रेंजहिल्स भागातील राॅयल कॅसल सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून तीन लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.