Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पुण्यात क्वीन्स गार्डन परिसरात घरफोडी

पुणे स्टेशन परिसरात तरुणाचा मोबाइल हिसकावला

पावणेपाच लाखांचा ऐवज लांबवला

marathinews24.com

पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाखांची रोकड, सोने-चांदीचे दागिने असा ४ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना पुणे स्टेेशन परिसरातील क्वीन्स गार्डन भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजी विक्रेत्याकडून जप्त केले गावठी पिस्टल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. ते सोपानबाग परिसरात राहायला आहेत. त्यांची आई क्वीन्स गार्डन परिसरातील आगरकरनगर भागात राहायला आहेत. १३ नोव्हेंबर रोजी सदनिका बंद होती. मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील तीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सदनिकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश वानखेडे तपास करत आहेत.

धनकवडीत सदनिकेतून ऐवजाची चोरी

धनकवडी भागातील एका सदनिकेतून चाेरट्यांनी २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील एका सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातून ऐवज लांबविला. पोलीस कर्मचारी नीलेश शिवतारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×