Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

भाजी विक्रेत्याकडून जप्त केले गावठी पिस्टल; २ जिवंत काडतुसे

गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने केली कारवाई

marathinews24.com

पुणे – रेकॉर्डवरील गुन्हेगार गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने एक गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. गणेश सतीश रणखांब (३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे गुन्हेगाराचे नाव आहे. गणेश रणखांब हा भाजी विक्रेता असला तरी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातील काही भागात कार्तिक वारीनिमित्त जड वाहनांना बंदी – सविस्तर बातमी

कोथरूडमध्ये २०१३ मध्ये खून तसेच २०१७ मध्ये खुनाचा प्रयत्न करणे आणि हाणामारी करणे असे ३ गुन्हे दाखल आहेत. तसेच डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रातील चौपाटीवर हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गणेश रणखांब याच्यासह तिघांना अटक केली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व त्यांचे सहकारी हे कोथरुड, वारजे परिसरात १४ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस हवालदार किशोर शिंदे व पोलिस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार एनडीए खडकवासलाकडे जाणाऱ्या रोडलगतच्या टी पॉईंंट चौक येथे पिस्टलसह थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन गणेश रणखांब याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये ४१ हजार रुपयांचे १ पिस्टल व २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात आर्म ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलिस कर्मचारी किशोर शिंदे, मारुती पारधी, अमोल काटकर, कैलास निम्हण, मोहम्मद शेख, पोलीस अंमलदार तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×