Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पुण्यातील काही भागात कार्तिक वारीनिमित्त जड वाहनांना बंदी

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

वाहतूक पर्यायी मार्गाने

marathinews24.com

पुणे – कार्तिक वारीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांची होणारी गर्दी विचारात घेऊन विश्रांतवाडी ते आळंदी रस्ता, तसेच नगर रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. या भागातील वाहतूक बदल २१ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.‘कार्तिकी एकादशी शनिवारी (१५ नोव्हेंबर) आहे. आषाढ वारीनंतर कार्तिक वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांची मोठी गर्दी होते. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी बांधव येतात. आठवडाभर श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांची गर्दी असते. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या येरवडा आणि वाघोली विभागाकडून वाहतूक बदल करण्यात आले आहेत’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

जिल्हा परिषद पुणे आयोजित दोन दिवसीय बालसाहित्य महोत्सव उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी

विश्रांतवाडीतून बोपखेल फाटामार्गे आळंदीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विश्रांतवाडीतून आळंदीकडे जाणाऱ्या ट्रक, कंटेनर चालकांनी येरवडा, खडकीतील होळकर पुलावरुन जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने इच्छितस्तळी जावे. नगर रस्त्यावरील तुळापूर फाटामार्गे आळंदी मरकळकडे जाणाऱ्या जड वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकणकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. आळंदी रस्ता, तसेच तुळापूर फाटा परिसरातील वाहतूक बदल २१ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×