Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

डाॅक्टरची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देण्याचे आमिषाने २४ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – सार्वजानिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड (ॲमिनेटी स्पेस) मिळवून देण्याच्या आमिषाने हडपसर परिसरातील महंमदवाडी येथील एका डॉक्टरांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश विसर्जन सोहळ्यात दागिने लांबविणारा चोरटा गजाआड – सविस्तर बातमी

माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेख (रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डाॅ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (वय ३९, रा. महंमदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी डाॅक्टरांचे महंमदवाडी परिसरात रुग्णालय आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत आरोपींनी ‘ॲमिनेटी स्पेस’ मिळवून देणे, तसेच महानगरपालिकेची परवानगी मिळवू देतो, असे सांगितले होते. डाॅक्टरांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी डॉक्टरांनी आपल्या पत्नीच्या आणि मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. मात्र, ठरलेली जागा न मिळवून न देता फसवणूक केली, असे डाॅ. सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×