Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पुणे पोलिसांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे सेवा पदक

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल

marahinews24.com

पुणे – छत्रपती संभाजीनगर पोलिस दलातील पोलिसांसह पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून मुलींसोबत गैरव्यवहार केला होता. त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. त्यानंतर पुण्यात मोठे आंदोलन उभे राहिले होते. याप्रकरणी आता संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ३३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पुणे पोलिस आयुक्तालयात पीडित मुलींसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्या अनेकांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. मात्र, त्यानंतर पुणे पोलिसांनीच या मुलींवर सरकारी कार्यात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संबंधित मुलींनी थेट पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती..याप्रकरणी अखेर कोथरूडच्या मुलींच्या लढ्याला यश मिळाले आहे. न्यायालाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्याचे देखील न्यायालयाने म्हटले होते.

कोथरूड पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १५) पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून ६ पोलिसांसह आठ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सहायक पोलिस निरीक्षक अमोल कामठे, पोलिस कर्मचारी संजीवनी शिंदे, सायबर विभागाचे पोलिस अधिकारी धनंजय सानप, पोलिस कर्मचारी विनोद परदेशी, कोथरूड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलिस शिपाई श्रुती कढणे, छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त पोलिस कर्मचारी सखाराम सानप आणि एपीआय प्रेमा पाटील यांची एक मैत्रिण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलिसांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय

कोथरुडमधील तीन मुलींसोबत तपासादरम्यान पोलिसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्या तीन मुली आणि आंदोलन कर्त्यांवरच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशा आंदोलनकर्त्यांनी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात एपीआय प्रेमा पाटील यांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर देखील न्यायालयाने सहायक पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×