Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ३३ लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ३३ लाखांची फसवणूक

घरातून ऑनलाइन कामाची आमिषे दाखवून सायबर चोरट्यांनी केली फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच घरातून ऑनलाइन कामाची संधी अशा प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरट्यांकडून सामान्यांची फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तक्रारदारांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

खासगी कंपनीतील कामगाराकडून रोकड चोरी – सविस्तर बातमी 

विश्रांतवाडी भागातील एका नागरिकाची घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी १९ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका तक्रारदाराने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने तक्रारदाराचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन कामात पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख १२ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची सायबर चोरट्यांनी ६ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पर्वती भागातील एकाची चोरट्यांनी ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक कोपनर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×