शाळेच्या कार्यालयातून रोकड लंपास; आपटे रस्त्यावर चोरीची घटना
Marathinews24.com
पुणे -शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना डेक्कन जिमखाना भागातील आपटे रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शाळेतील लिपिक महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपटे रस्त्यावरील आपटे शाळेच्या आवारात मध्यरात्री चोरटे शिरले. शाळेतील मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप चोरट्यांनी तोडून कार्यालयात शिरले. कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कप्प्यातील १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी तपास करत आहेत.