Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवले

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवले

मध्यवर्ती सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ अपघात

marathinews24.com

पुणे – मद्यधुंद वाहन चालकाने भरधाव वाहन चालवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना उडवून गंभीर जखमी केले आहे. जखमीपैकी चार जणांचे पाय मोडले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात शनिवारी (दि. ३१ ) संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास मध्यवर्ती सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ घडला आहे. याप्रकरणी संबंधित वाहन चालकासह तिघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालक जयराम मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी), मालक दिगंबर यादव शिंदे (वय २७) आणि सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने १२ विद्यार्थ्यांना उडवले

 

पोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआड; शहरात ४ गुन्हे केल्याचे उघड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ नारायण साई चहा दुकानात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास भरधाव मद्यधुंद मोटर चालक जयराम मुळेचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट चहाच्या दुकानात शिरली. त्यामुळे परिसरात थांबलेल्या १२ जणांना त्याने धडक दिली. अपघातामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.

यापक्ररणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपीनी मद्यपान केले होते की नाही, याबाबत त्यांची मेडिकल चाचणी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात तिघेही आरोपी मद्यपान केल्याचे दिसून आले आहे. मद्यधुंद चालकाने दिलेल्या धडकेत इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे त्यासोबत १२ जण जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे

जखमी विद्यार्थी अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर,पायल आदेश कुमार दुर्गे , गुलणाज सिराज अहमद अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील तीन जणांना उपचारासाठी संचेती हॉस्पिटल, तर इतर ९ विद्यार्थ्यांना योगेश हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×