Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पोलिसांना गुंगारा देणारे सोनसाखळी चोरटे गजाआड

शहरात ४ गुन्हे केल्याचे उघड

marathinews24.com

पुणे – महिलांचे दागिने हिसकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांना तीन वर्ष गुंगारा देणाऱ्या चोरट्यांना खराडी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी शहर परिसरात चार गुन्हे केल्याचे तपासाता उघडकीस आले आहे. फिदा मनुअली इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), अली अब्बास फिरोज सय्यद (वय ३०, रा. इराणी वस्ती, अंबिवली, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय –  सविस्तर बातमी

खराडी भागात एका फळ विक्रेत्याच्या गाडीवर फळे खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करुन इराणी आणि सय्यद यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी खराडी, अलंकार, भारती विद्यापीठ परिसरात महिलांकडील दागिने हिसकाविण्याचे गुन्हे केल्याचे उघड झाले.

आरोपींकडून दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी फिदा इराणी याच्याविरुद्ध खडकी, शिवाजीनगरसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे १७ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, फसवणूक, शस्त्र बाळगणे, वाहन चाोरी, दागिने हिसकावणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तो गेली साडेतीन वर्षे फरार होता.

सय्यद याच्याविरुद्धही ठाणे आणि नवी मुंबई परिसरात १७ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे, अमित जाधव, श्रीकांत कोद्रे, वसीम सय्यद, सचिन रणदिवे आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×