Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

बाह्यवळण मार्गावर ट्रकवर टेम्पो आदळून एकाचा मृत्यू वारजे भागात अपघात

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

टेम्पोचालकाविरुद्ध वारजे पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे -मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघाातात एक जण जखमी झाला. भरधाव टेम्पो चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कोथरूड मधील बंगल्यात चंदन चोरी – सविस्तर बातमी

अफाक अहमद आझाद खान (वय २९) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. अपघातात फरमान अनिस खान (वय १९) जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टेम्पोचालक कमरुद्दीन तजम्मुल खान (वय २९, रा. पिंपरिया, बहारिच, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ट्रकचालक शाम श्रीहरी धुमाळ (वय ४१, रा. एककुंडी, ता. कागल, जि. कोल्हापूर) याने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन भरधाव वेगाने टेम्पो निघाला होता. वारजे भागातील साने चौकात भरधाव टेम्पो ट्रकवर आदळला. ट्रकच्या मागील बाजूचे नुकसान झाले. अपघातात ट्रकमधील क्लिनर अफाक खान आणि फरमान खान हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी अवस्थेतील अफाक आणि फरमान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच अफाक याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नगर रस्त्यावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रभान रामप्रताप वर्मा (वय २५, मूळ रा. राजस्थान) असे मृत्युमुखी पडलेल्या  दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मांगीराम जाट (वय २५, रा. लोणीकंद, नगर रस्ता) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार चंद्रभान वर्मा हा २९ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास नगर रस्त्याने निघाला होता. लोणीकंद परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार वर्माला धडक दिली.

अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपरचालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घाेरपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×