Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

ऑनलाईन टास्कचे आमिष पडले १२ लाखांवर

Cyber Fraud Pune

सायबर चोरट्यांकडून तरूणीला गंडा

marathinews24.com

पुणे – ऑनलाईनरित्या दिलेले टास्क पुर्ण केल्यानंतर जादा नफा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणीला तब्बल १२ लाख ६३ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २२ ते २४ मे कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी पूजा जहागिरदार वय ३४ रा. खराडी यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, नणंदसह चौघांविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पूजा जहागिरदार खराडीत राहायला असून, खासगी कंपनीत कामाला आहेत. २२ मे रोजी सायबर चारेट्यांनी त्यांना संपर्क केला. ऑनलाईनरित्या टास्कचे आमिष दाखवून ते पुर्ण केल्यास चांगला नफा देण्याची बतावणी केली. त्यानुसार सायबर चोरट्यांनी सुरूवातीला काही रक्कम पूजाच्या बँकखात्यात वर्ग केली. त्यामुळे विश्वास संपादित झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूकीला सुरूवात केली.

अवघ्या दोन दिवसांत त्यांनी १२ लाख ६३ हजार रूपये वर्ग केले. मात्र, परतावा न मिळाल्यामुळे त्यांनी संबंधिताला फोन केला. त्यावेळी त्याने संवाद न साधता संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पूजाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×