Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या, नणंदसह चौघांविरूद्ध गुन्हा

धनकवडी भागातील घटना

marathinews24.com

पुणे छळाला कंटाळून महिलेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना ८ मे रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धनकवडीतील गोविंदराव पाटील नगरात घडली आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नणंदसह चौघांविरूद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपासाअंती संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी

वर्षा तुकाराम रणदिवे (वय ३५ रा. व्यंकटेश अपार्टमेंटसमोर, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उज्ज्वला बागाव (वय ५०) , योगेश बागाव (वय ३५), वैशाली बागाव (वय ३२), सुवर्णा बागाव (वय २५) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम रणदिवे (वय ५३ रा. धनकवडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम आणि वर्षा धनकवडीतील गोविंदराव पाटील नगरात राहत होते. त्यावेळी तुकारामची बहीण उज्ज्वला, तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली, सुवर्णा यांनी संगनमताने ८ ते २४ मे कालावधीत वर्षासोबत भांडण केले. तिचा छळ केल्यामुळे वर्षाने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासाअंती आरोपींनी महिलेचा छळ केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×