Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

अवघ्या चार तासांत अपहरणग्रस्त चिमुरड्याची केली सुटका, आरोपीला बेड्या

वानवडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

marathinews24.com

पुणे – घरासमोर खेळत असलेल्या चिमुरड्याचे अपहरण करीत पसार झालेल्या आरोपीच्या वानवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अवघ्या चार तासांत मुलाची सुटका झाल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.सुजल नितीश सोळंकी (१९, रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पुण्यात मद्यधुंद मोटार चालकाने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना उडवले; मध्यवर्ती सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ अपघात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आंबिका भारत कदम ऊर्फ अस्वरे (रा. नवीन म्हाडा, हडपसर) यांचा मुलगा संस्कार हा शनिवारी (दि. ३१ ) घराबाहेर खेळत होता. त्यावेळी एकाने त्याचे दुचाकीवरून अपहरण केल्याची तक्रार अस्वरे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीनुसार, सुजल नितीश सोळंकी (१९, रा. हडपसर) या युवकाने मुलाला दुचाकीवरून पळवून नेले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने कारवाई सुरू केली. आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने तपास सुरु केला.

आरोपी सुजल सोळंकी हा दौंड तालुक्यातील दहीटणे गावात असल्याचे उघड झाले. त्यानुसार पथकाने दहिटणे येथे शोधमोहीम राबवली असता, आरोपीने बालकाला सोडून शेतात पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तीन वर्षीय संस्कारला सुखरूपपणे आईच्या ताब्यात देण्यात आले.अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. कारवाईत पोलीस अंमलदार रमेश साबळे, अतुल गायकवाड, महेश गाढवे, अमोल पिलाणे, यतीन भोसले यांचाही मोठा सहभाग होता.

यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांनी वानवडी पोलिसांचे आभार मानले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, अतुल गायकवाड, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, गोपाळ मदने, अभिजीत चव्हाण, सोमनाथ कांबळे यांनी केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सपना सोळंके करीत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×