Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

चेतन चैाधरीची लोहगडावर चौकशी – पोलिसांकडून पुन्हा ‘सीन रिक्रिएशन’

चेतन चैाधरीची लोहगडावर चौकशी - पोलिसांकडून पुन्हा ‘सीन रिक्रिएशन’

केतन अगरवाल हत्या प्रकरण

marathinews24.com

पुणे – व्यावसायिक केतन अगरवाल हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चैाधरी याची बुधवारी ( दि.१) सकाळी ग्रामीण पोलिसांनी पुन्हा लोहगडावर नेऊन चौकशी केली. घटनास्थळी चौधरी नेल्यानंतर नेमकी घटना कशी घडली, याची माहिती घेतली. पुन्हा पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) करण्यात आली. लोहगडावर सुरू असलेल्या पावसात पोलिसांनी सुमारे अडीच तास चेतनची चौकशी केली. केतन अगरवाल याची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जूनला केतनला लोहगडावरील हत्ती तलावाजवळ असलेल्या कड्यावरुन ढकलून दिल्याची घटना घडली होती.

पुण्यात तस्करांची आयडिया, थेट पोर्टरद्वारे ड्रग्जची विक्री – सविस्तर बातमी 

केतन सेल्फी काढताना दरीत पडल्याची बतावणी सियाने त्याच्या कुटुंबीयांकडे केली होती. अगरवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणात सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत सियाला केतनबरोबर विवाह अमान्य नसल्याने तिने प्रियकर चेतन याच्याशी संगनमत करुन केतनचा खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. केतन याच्या हत्या प्रकरणाचा कट दोघांनी रचल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वडगाव मावळ न्यायालयाने दोघांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे अदोश दिले आहेत.

‘यापूर्वी सियाला लोहगडावर नेण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पुनर्रचना केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी चेतनला पुन्हा लोहगडावर नेण्यात आले. सुमारे अडीच तास त्याची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी चेतनला घेऊन घटनास्थळाची पुनर्रचना केली’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांकडून आरोपींचे जबाब, न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे. लोहगडावरील चौकशीचे चित्रीकरण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

चेतन चौधरीची ‘गेट’ चाचणी

लोहगडावरील कड्यावरुन केतनला दरीत कसे ढकलले, याबाबतची मााहिती घेण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपी चेतन चौधरीची चालण्याची लकब जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. लोहगडावरील पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणात चेतन घटनेच्या दिवशी दिसून आला होता. त्याने वेशांतर केले होते. चेतनच्या चालण्याची लकब जाणून घेण्याच्या दृष्टीने ‘गेट ॲनलसिस’ चाचणी करण्यात येणार आहे.

कुंडली पत्रिकेत २७ गुण जुळले

केतन आणि सियाचा विवाह करण्यापूर्वी अगरवाल आणि गोयल कुटुंबीयांनी त्यांची पत्रिका पाहिली होती. पत्रिकेत दोघांचे २७ गुण जुळले होते. मात्र, सिया गोयलला विवाह मान्य नव्हता. तिने प्रियकर चेतन चौधरीशी संगनमत करुन केतनला लोहगडावरुन ढकलून देण्याचा कट रचला होता. घटनेच्या आदल्या दिवशी सिया आणि चेतन हे लुल्लानगरमधील कॅफेत भेटले होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्लानगरमधील मोकळ्या जागेत दोघांनी चेतनला ढकलून कसे द्यायचे, याबाबतचा सराव केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×