Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात तस्करांची आयडिया, थेट पोर्टरद्वारे ड्रग्जची विक्री

पुण्यात तस्करांची आयडिया, थेट पोर्टरद्वारे ड्रग्जची विक्री

दोघांना बेड्या, विमानतळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पोलिसांच्या नजरेतून वाजण्यासाठी तस्कराने आयडिया शोधून ऑनलाईन विक्रीचा मार्ग निवडला. थेट पोर्टरद्वारे प्रतिबंधित ई-सिगारेट, हुक्का फ्लेवरची घरपोहोच सेवा सुरू केली. ना संशय, ना पकडले जाण्याची भीती. मात्र, विमानतळ पोलिसांनी संबंधित तस्करांचा पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून १ लाख ४३ हजारांचे हुक्का फ्लेवर, ई-सिगारेटसह इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, तस्कराने पोर्टरद्वारे अमली तस्करीची निवडलेली आयडिया पोलिसांनी उध्वस्त केल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले – सविस्तर बातमी 

असद चांदमिया बरभैया (वय ३१ रा. कोंढवा) आणि विकास रमेश बागूल (वय ३३ रा. मोहम्मंदवाडी )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईनपणे इ-सिगारेटसह हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अमलदार हरीप्रसाद पुंडे यांना मिळाली. त्यानुसार ३० जूनला बनावट ग्राहकाच्या मदतीने पथकाने ऑनलाईनरित्या हुक्का फ्लेवरची ऑर्डर दिली. त्यानुसार विमाननगरमधील कोणार्कनगरात पोर्टरद्वारे डिलीव्हरी देण्यासाठी एकजण आला. पथकाने त्याला ताब्यात घेउन, पार्सल घेतलेल्या ठिकाणाची माहिती घेतली.

डिलीव्हरी बॉयने पार्सल हे एनआयबीएमर रोडनजीक मोहमंदवाडीतून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार विमानतळ पोलिसांच्या पथकाने कड नगरचौक शिशा कॉर्नर दुकानावर छापा टाकला. त्याठिकाणाहून असद बरभैया, विकास बागूल यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या दुकानातून १ लाख २५ हजारांचा हुक्का, इ-सिगारेटसह साहित्य जप्त केले. आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही कामगिरी उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक पोलीस आयुक्त सुनील दोरगे, वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके, उपनिरीक्षक नितीन राठोड, लालु कर्‍हे, राहूल जोशी, रूपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोम्पे, प्रशांत सुतार, अंकुश जोगदंडे, आशा धादवड, सना शेख यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×