सहयाद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके
marathinews24.com
पुणे – नागरी संरक्षण दल, गृह विभाग (विशेष) पुणे शहरच्यावतीने सहयाद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी रुग्णालयामधील डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचाऱ्यांना मॉकड्रीलच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.
पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त – सविस्तर बातमी
यावेळी नागरी संरक्षण दलाचे 11 स्वयंसेवक, 30 होमगार्ड जवान आणि पुणे महानगरपालिकेच्या येरवडा येथील अग्निशमन विभागाने अग्निशमन अधिकारी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली अचानक लागलेल्या आगीपासून बचाव करण्याबाबत विविध प्रकारचे फायर नोजल वापरून दाखविले. इन्सिटंट कमांडर ऑफिसर म्हणून नागरी संरक्षण दल पुणे शहरचे मुख्य क्षेत्ररक्षक जॉर्ज स्वामी यांनी काम पाहिले व महिला मानसेवी अधिकारी अर्चना वाघमारे यांनी हॉस्पिटल मधील रूग्ण व नातेवाईकांना घाबरू नये, अफवा पसरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत माहिती दिली.
नागरी संरक्षण दल पुणे शहर कार्यालयातर्फे ज्येष्ठ सहा. उपनियंत्रक अर्जुन कुऱ्हाडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह आपत्तीच्याकाळात दरम्यान घाबरून न जाता सुरक्षात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. नागरी संरक्षण दल पुणे शहरचे उपनियंत्रक ले. कर्नल (नि) प्रशांत चतुर, मुख्य क्षेत्ररक्षक जॉर्ज स्वामी यांनी मॉकड्रीलचे नियोजन केले.