Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी!

फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे पुणे ते महाबळेश्वर रॅली; देखण्या गाड्यांनी वेधले लक्ष

marathinews24.com

पुणे – पिढ्यानपिढ्या जतन केलेली, चमकदार क्रोमची किनार, गोलाईदार बॉडीची देखणी ठेवण आणि शांत पण दमदार आवाजात धावणारे इंजिन, हलके स्टिअरिंग, हॅन्डगिअर, क्लासिक ग्रील, स्लिक व रुबाबदार हेडलाईट्स अन लक्षवेधक फियाट कार्सचा क्लासिक नजराणा पाहून पुणेकर हरखले. ‘क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी’ याप्रमाणेच फियाट कारचा ताफा शहरातून मार्गक्रमण करत महाबळेश्वरकडे रवाना झाला. १९५५ पासूनच्या विविध रंगांच्या २० पेक्षा अधिक क्लासिक गाड्यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा सुरेल प्रारंभ – सविस्तर बातमी

फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे या क्लासिक फियाट कार रॅलीचे शनिवारी आयोजन केले होते. पुणे ते महाबळेश्वर या निसर्गरम्य मार्गावर जुन्या काळातील देखण्या आणि जतन केलेल्या फियाट गाड्यांचा निघालेला ताफा रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. सहभागी वाहनचालकांनी आपल्या गाड्यांची मूळ रचना आणि वैशिष्ट्ये जपून ठेवली असल्याने वाहनप्रेमींना ऑटोमोबाईल इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मार्गात अनेक ठिकाणी नागरिकांनी या गाड्यांचे छायाचित्रण करत सहभागींना दाद दिली.

यावेळी आयोजक संजय प्रकाश ढेरे म्हणाले, “क्लासिक वाहनांचा वारसा जतन करणे आणि तरुण पिढीला या गाड्यांविषयी आकर्षण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा रॅलींमुळे वाहनप्रेमी एकत्र येतात आणि ऐतिहासिक वाहनसंस्कृती जिवंत राहते. १९५५ पासूनच्या विविध मॉडेलच्या फियाट कार असलेले आम्ही सर्वजण हा क्लब चालवतो. काळ्या, निळ्या, लाल, पांढऱ्या, हिरव्या अशा विविधरंगी व्हिंटेज कार घेऊन आम्ही महाबळेश्वर, गोवा, मुंबई, बंगळुरू, कन्याकुमारी असे विविध ठिकाणांना भेटी देत असतो.” माझ्या वडिलांची ही गाडी असल्याने माझ्याशी त्याचा भावनिक बंध असून, ती चालवताना वडिलांचा सहवास मला मिळतो, असे भावनिक उद्गार ढेरे यांनी काढले.

शीतल सोनकांबळे यांनी सांगितले की, माझ्याकडे १९९१ मधील फियाट कार आहे. ही कार आमच्या कुटुंबासाठी केवळ वाहन नसून आठवणींचा ठेवा आहे. अनेक वर्षे जपून ठेवलेल्या या गाडीची देखभाल आम्ही स्वतः करतो आणि अशा रॅलीत सहभागी होताना तिचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. लोकांच्या उत्सुक नजरा आणि कौतुकाचे शब्द हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक असते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×