५ दुकानदारांना अटक
marathinews24.com
पुणे – Crime News : शहरातील विविध भागातील किराणा दुकान, पानपट्टीत गुटखा विक्री करणाऱ्या ५ जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४९ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. राहुल प्रकाश संचेती (वय ३२, रा. शंभुराजे मित्र मंडळाजवळ, आंबेगाव), प्रमोद प्रकाश संचेती (वय ३६, रा. आंबेगाव), रवींद्र राजकुमार वाकडे (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज), सुनील दगडु सुरवसे (वय २४, रा. वडगाव) आणि प्रशांत बच्चा कुलाल (वय ४१, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बांगलादेशी महिलांसह तिघे अटकेत, कात्रजमध्ये कारवाई – सविस्तर बातमी
पोलीस कर्मचारी अजय कामठे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. आंबेगाव, कात्रज, वडगाव भागातील दुकाने, तसेच पानपट्टीत गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चार ठिकाणी छापा टाकला. त्यांच्याकडून गुटखा जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासाहेब पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी ही कारवाई केली.
घरात गावठी दारुचा अड्डा चालविणारी महिला अटकेत
Crime News : घरात गावठी दारुचा अड्डा चालविणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली. भवानी पेठेती कासेवाडीत छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. राधा अनिल साेनवणे (वय ५०, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा सोनवणे ही कासेवाड परिसरात घर भाड्याने घेऊन राहत आहे. ती घरात गावठी दारू विक्रीचा अड्डा चालवित असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. सोनवणेच्या घरातून ३५० लिटर गावठी दारू, चार हजार ३४० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा सोनवणेने घर भाडेतत्त्वावर घेतले होते. गावठी दारुची विक्री ती करत होती. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करत आहेत. ग्रामीण भागात गावठी दारु तयार करुन ती शहरात विक्रीस पाठविली जाते. शहरातील दाट वसाहतीत छुप्या पद्धतीने गावठी दारू विक्री केली जाते.